चिपळूण : अलोरेत खेळाच्या मैदानाचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते भूमीपूजन

चिपळूण : चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानाच्या धर्तीवर अलोरे येथील मैदान सुसज्ज होईल व येथील पंचक्रोशीतील खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी अलोरे येथील खेळाच्या मैदानाच्या भूमिपूजन प्रसंगी केले. यावेळी आ. निकम यांनी या मैदानाच्या विकसित कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल येथील ग्रामस्थांतर्फे
त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, युवक तालुकाध्यक्ष नीलेश कदम, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, जयंत शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, अलोरे शिरगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 11/Jan/2025