◼️ गेल्या महिनाभरापासून गॅस सिलिंडरच्या टंचाईने ग्राहकांचे हाल
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर ऑनलाईन बुकिंग करून आठवडा होऊन गेला तरी आणून दिला जात नाही, त्यामुळे गॅस एजन्सीच्या बाहेर सिलिंडर घेण्यासाठी दररोज रांग लागत आहे. यातून ग्राहकांना एजन्सीमधून गॅस सिलिंडर नेण्यासाठी अधिकचा खर्च सोसावा लागत आहे. त्याचबरोबर रांगेत उभे राहून वेळही वाया जात आहे. गॅस सिलिंडरची टंचाई असल्याचे शांतादुर्गा एजन्सीमधील काऊंटरवरील महिलेने सांगितले.
वाहनांसाठी लागणाऱ्या एलपी गॅसची अधूनमधून टंचाई असते. गॅस पंपांवरही वाहनांची रांग लागते. त्याचप्रमाणे आता गॅस एजन्सीच्या ठिकाणी रांगा लागू लागल्या आहेत. आठवडाभर अगोदर ऑनलाईन बुकिंग करूनही सिलिंडर घरी आणून दिला जात नसल्याने ग्राहक एजन्सीकडे जात आहेत.
एजन्सीमध्ये मात्र सिलिंडर दिला जात असला तरी तो येथून नेण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे. त्याचबरोबर रांगेत उभे राहण्यासाठीही ग्राहकांचा वेळ वाया जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 30-09-2024














