दृक्श्राव्य माध्यमांचा कौशल्याने वापर करणे गरजेचे : डॉ. सत्येंद्र राजे

रामपूर : माहिती तंत्रज्ञान युगात दृक्श्राव्य माध्यमांचा आपल्याला अतिशय कौशल्याने वापर करता आला पाहिजे. तसेच माहितीपट, चित्रपट, लघुपट या संकल्पनाचे स्वरुप समजवून घेणे गरजेचे आहे. एखादी महनीय व्यक्ती, गाव, पर्यटन स्थळे, संस्था, उद्योग, यशस्वी उद्योजक अशा विविध प्रकारच्या विषयीची वस्तूनिष्ठ माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्याचा प्रयत्न महितीपटातून करता येतो, असे प्रतिपादन डॉ. सत्येंद्र राजे यांनी केले.

मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हाने येथे इतिहास विभागाच्यावतीने माहितीपट निर्मिती प्रक्रिया (डॉक्यूमेंटरी मेकिंग) या विषयावर मार्गदर्शन वर्ग पार पडला. यावेळी ते बोलत होते.

चित्रपट काल्पनिक असतात तर माहितीपट वास्तवदर्शी असतात. माहितीपट बनवताना संशोधनात्मक पूर्वतयारी, सामूहिक जबाबदारी, तांत्रिक गोष्टी, कथा, पटकथा, संवाद, लेखन, पार्श्वसंगीत, कॅमेरा इ. मूलभूत घटकांचा आढावा डॉ. सत्येंद्र राजे यांनी घेतला.

यावेळी डॉ. सत्येंद्र राजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेव यादव यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या मार्गदर्शन वर्गाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रांत टेरवकर यांनी केले तर प्रा. सुप्रिया वाघे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 11/Jan/2025