रत्नागिरी : रत्नागिरी खबरदार आयोजित वुमेन्स कार्निव्हल २०२५ ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दररोज या कार्निव्हल मध्ये ग्राहकांना ४० हजारांची आकर्षक बक्षिसे देण्यात येतात. या शिवाय दररोज ५ हजार पेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकाला ‘शॉपिंग क्वीन’ म्हणून घोषित करण्यात येते. आज या कार्निव्हल चा शेवटचा दिवस आहे. म्हणून सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी एक योजना जाहीर केली आहे. यानुसार आज सायंकाळी ७ ते ८ यावेळात वुमेन्स कार्निव्हल ला पालकांसोबत भेट देणाऱ्या १२ वर्षांपर्यंत मुलांमधून एक भाग्यवान विजेता काढून त्याला सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी सहकुटुंब या कार्निव्हल ला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.














