रत्नागिरी : नेवरे खाडीत बुडून प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे खाडीत बुडून एका प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास उघडकीस आली. दिलीप सहदेव फणसे (४२, रा. चिंचवणे नेवरे, रत्नागिरी) असे खाडीत बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी नेवरे येथील खाडीच्या पाण्यात तेथील ग्रामस्थांना दिलीप फणसे हा बुडून मृतावस्थेत दिसला. याबाबत त्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 13/Jan/2025