रत्नागिरी : मनोरुग्णालयात पडून गंभीर दुखापत झालेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : येथील मनोरुग्णालयात पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या महिला रुग्णाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सीमा प्रवीण बाचल (४४, मूळ रा. शिरगाव, ता. कराड जि. सातारा) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ती मनोरुग्ण असल्याने तिच्यावर रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना ती हॉस्पिटलमध्येच पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान १ जानेवारी २०२५ रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात ११ जानेवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 13/Jan/2025