राजापूर : राजापूर तालुक्यातील पेंडखले गावातील सुप्रसिद्ध असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री भवानी देवीचा यात्रोत्सव सोमवार १३व १४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या यात्रोत्सवात रात्री १२ वाजता पोत पाजळण्याचा कार्यक्रम होणार आहे. या यात्रोत्सवानिमित्त श्री सिद्धिविनायक नमन मंडळ भू मधलीवाडी यांचे स्त्री पात्राने नटलेले नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या यात्रोत्सवाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. नागरिकांनी व भाविकांनी यात्रोत्सवात श्री भवानी देवीचे दर्शनाचा व त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन व्यवस्थापक यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 13/Jan/2025














