रत्नागिरी : विशेष सहायक सरकारी वकिलांची सेवा थांबली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयांमध्ये काम करणाऱ्या विशेष सहायक सरकारी वकिलांची सेवा थांबवण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य अभियोग संचालनालयाच्या परिपत्रकानुसार विशेष सहायक सरकारी वकिलांना काम करता येणार नाही. शासनाने नवीन सहायक सरकारी वकिलांच्या न्यायालयीन निहाय नियुक्त्या केल्याने झालेली गुंतागुंत सोडविण्यासाठी विशेष सहाय्यक सरकारी वकिलांचे काम थांबले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १७ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची १७ न्यायालये आहेत. या न्यायालयामध्ये नियमित सरकारी वकील नसल्याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सरकारी अभियोक्ता कार्यालय सहाय्यक संचालकांच्या समितीने विशेष सहायक सरकारी वकिलांची नियुक्ती केली.

शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील १७ पैकी १० न्यायालयामध्ये नवीन सहाय्यक सरकारी वकिलांची न्यायालयांच्या क्रमांकानुसार नियुक्ती केली. रत्नागिरी जिल्ह्यात १० पैकी ६ ते ७ नवीन सरकारी वकील रुजू झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:47 PM 13/Jan/2025