जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडी येथील नदीवर मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय तसेच तरवळ माचिवलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तरवळ नदीवर श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.
तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बंधारा उभारण्याचा संकल्प जाकादेवी विद्यालयाला सदिच्छा भेटीप्रसंगी केला होता. या संकल्पनेचे शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करुन मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रेरणा दिली. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधारा उभारण्याचे काम यशस्वी केले.
१०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा संकल्प पूर्णत्वास नेला. यात स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तरवळ गावात २० मिनिटे पायी चालत जाऊन बंधाऱ्याला भेट दिली. विद्यार्थी व ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 13/Jan/2025














