साडवली : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशनच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित १८ वी क्युरोगी व १२ वी पुमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांदो स्पर्धा सन २०२४-२५ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संगमेश्वरच्या खेळाडूंनी सुयश प्राप्त करत ५२ सुवर्ण पदक, २८ रौप्य पदक व २२ कास्य पदके पदकावली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ६०० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमीच्या अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब या सर्व क्लबच्या खेळाडूंनी संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. पुमसे मध्ये प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला व फ्री-स्टाइल पुमसे मध्ये द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला तसेच सीनियर गटामध्ये साहिल शशांक घडशी याने १० सुवर्णपदक पटकावून बेस्ट फाईटरची ट्रॉफी प्राप्त केली. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून खेळाडूंनी मेडल प्राप्त केले.
यशस्वी तायक्वांदोपटुंना नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब देवरुख या ठिकाणी तालुका प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब अध्यक्षा स्मिता लाड, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने, क्लब प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या सर्व पदक पटकाविलेल्या खेळाडूंना तालुका अॅकॅडमीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. सुभाष बने, आ. शेखर निकम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, देवरुख शहराच्या माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 13/Jan/2025














