रत्नागिरी : शालेय विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोपले

◼️ संस्थेकडून शिक्षक निलंबित; प्रकरण पोलीस स्थानकात

रत्नागिरी : शहरातील एका शाळेत शिक्षकाने गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. मुलीने हा प्रकार पालकांना सांगितल्यावर त्या मुलीचे पालक शाळेत आले आणि त्या शिक्षकाला चोप दिला. प्रथमेश नवेले असे या शिक्षकाचे नाव असल्याची माहिती संस्था पदाधिकार्‍यांनी दिली.

यावेळी शाळेतील शिपायाने मध्ये येत उलट पालकांना देखील मारल्याचे बोलले जात आहे. शहरातील या नामांकित शाळेमध्ये असा प्रकार घडल्यावर एकच खळबळ उडाली आहे. शाळेत हा प्रकार घडताच या ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले. त्यानंतर या संस्थेचे पदाधिकारी देखील शाळेत पोहचले. झालेली घटना दुर्दैवी असून याचा सखोल तपास करून शिक्षक दोषी असल्यास त्याला शिक्षा व्हावी असे संस्था पदाधिकार्यांनी सांगितले. तसेच या शिक्षकाचे तातडीने निलंबन केल्याचे देखील संस्था पदाधिकार्‍यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 13-01-2025