रत्नागिरी : कृषि उत्पन्न बाजार समितीचे मार्केट सेस संदर्भात जिल्हयातील व्यापा-यांना आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचा सातत्याने वाढणारा तोटा लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दिनांक १५/०१/२०२५ पासून मच्छि वरील सेस व सुपारी आणि बांबू जळाऊ लाकूड यावरील सेस नियमाप्रमाणे आकारण्याचा निर्णय समितीचे संचालक मंडळाने घेतला आहे, असे समितीचे सभापती श्री. सुरेश भिकाजी सावंत व सचिव यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हयाचे खासदार व जिल्हयातील नवनिर्वाचित सर्व आमदार यांच्या गाठीभेटी घेऊन बाजार समितीची सद्यस्थितीतील आर्थिक स्थितीची माहीती दिली असून समितीला मिळणारा मार्केट सेस हाच बाजार समितीच्या उत्पन्नांचा एकमेव स्त्रोत असल्याचे निदर्शनांस आणून दिले आहे. त्यावेळी सर्व खासदार व आमदार यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

तरी जिल्हयातील सर्व मासे व्यापारी, खैर व्यापारी, काजूबी व्यापारी, सुपारी व्यापारी, बांबू जळाऊ लाकूड व्यापारी यांनी समितीचे तपासणी नाक्यावर मार्केट सेस भरुन यापूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, असे समितीच्या वतीने सभापती श्री. सुरेश भिकाजी सावंत व सचिव यांनी व्यापारी वर्गाला आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 13-01-2025