रत्नागिरी खबरदार च्या न्यूज अॅप चा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट न्यूज नेटवर्क म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरी खबरदारच्या वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जास्तीतजास्त वाचकांपर्यंत रत्नागिरी आणि जगभरातील बातम्या पोहोचवण्याच्या हेतूने आता रत्नागिरी खबरदार ने एक न्यूज अॅप विकसित केले आहे.

रत्नागिरी खबरदार च्या या न्यूज अॅप चा शुभारंभ राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी खबरदारचे न्यूज अॅप स्वतःच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून या न्यूज अॅपचा शुभारंभ केला.

रत्नागिरी खबरदार आयोजित वुमेन्स कार्निव्हल च्या उद्घाटन प्रसंगीच हा सोहळा पार पडला. आता गुगल प्ले स्टोअर्स वर हे अॅप उपलब्ध असून आता प्रत्येकाला या अॅप द्वारे रत्नागिरी आई जगभरातील बातम्या मिळणार आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.ratnagirikhabardar

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 13-01-2025