गोगटे महाविद्यालयात २० ते ३० जानेवारी दरम्यान मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील इतिहास विभागातर्फे मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्ग सर्वांसाठी खुला असून, यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग दि. २० ते ३० जानेवारी या कालावधीत संध्याकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित केला जाईल. मोजक्या जागाच उपलब्ध असल्याने इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी प्रा. पंकज घाटे, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 13/Jan/2025