रत्नागिरी : जिल्हा परिषदेची सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्यासाठी काम वाटप समितीची सभा दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेली आहे. मंगळवार, दि. १४ जानेवारी रोजी मजूर सहकारी संस्था, सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (विद्युत), सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (स्थापत्य) संपूर्ण जिल्ह्यासाठी सकाळी ११.३० वाजता काम वाटप समिती सभा होणार आहे. या सभेमध्ये रु. १० लाखांच्या आतील कामांचे वाटप होणार असल्याचे सदस्य सचिव काम वाटप समिती, जि.प. तथा कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम यांनी कळविले आहे. यावेळी बेरोजगार अभियंता आणि मजूर सहकारी संस्था पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 13/Jan/2025














