सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १६ व १७ जानेवारी या कालावधीत सावर्डे येथील स्मृतिगंध या त्यांच्या स्मारक स्थळी जयंती महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त १६ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता सामाजिक, क्रीडा अथवा शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या संस्थेस शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्काराने सन्मानित केले जाते. २०२५ चा हा पुरस्कार राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोटने आपल्या भरीव कामगिरीने प्राप्त केला असून त्याचे वितरण याच दिवशी केले जाणार आहे. राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करून त्यांचा आदर्श समाजामध्ये रुजवण्याचे कार्य सुरू आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या त्यांच्या कार्याचा ठसा समाजावर उमटत आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे संस्थेचे सचिव महेश महाडिक, सोहळा समिती आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 13/Jan/2025














