राजापूर : कोकण रेल्वेमार्गावरील सोल्ये येथील राजापूर रोड, सौंदळ, लांजा येथील विलवडे, आडवली रेल्वेस्टेशन येथे अतिरिक्त रेल्वेगाड्यांना थांबे मिळाल्यास राजापूर मतदारसंघातील दळणवळणामध्ये भर पडून स्थानिक रोजगार आणि व्यवसायाला चालना मिळणार आहे. रोजगार उपलब्ध झाले तर कोकणातून मुंबई, पुण्याकडे जाणारे तरुणांचे लोंढे कमी होतील. त्यासाठी राजापूर रोड, सौंदळ, लांजा येथील विलवडे, आडवली रेल्वेस्टेशन येथे अतिरिक्त रेल्वेगाड्यांना थांबे मिळावेत, अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आमदार किरण सामंत यांच्याकडे केली आहे. या वेळी अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर बागवे, सेक्रेटरी यशवंत जड्यार, जयवंत साठे, संजना पालव, यशवंत परब आदीसह रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 14/Jan/2025














