चिपळूण : पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. लोटे येथील घरडा केमिकल्स कंपनी, लवेल येथे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय, बाई रतनबाई घरडा यांच्या नावाने समाजासाठी खूप काही दान देणारे डॉ. घरडा, अशी त्यांची ओळख होती. निधन प्रसंगी ते ९५ वर्षांचे होते.
लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी ४० वर्षांपूर्वी घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. कृषी रसायनामध्ये ही कंपनी कार्यरत असून, या क्षेत्रात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यामुळे त्यांना शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. डॉ. घरडा यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचा सन्मान झालेला आहे.
लोटे आणि चिपळूण परिसरात त्यांनी घरडा फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले. आजही त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत. लवेल येथे घरडा रुग्णालय देखील त्यांनी उभे आहे. केले या कंपनीने लोटे आणि डोंबिवली येथे कार्यविस्तार केला. मुंबईतील वांद्रे येथे त्यांचे मुख्य कार्यालय आहे. या शिवाय गुजरातमध्ये देखील या व्यवसायाचा पसारा वाढला आहे. त्यांच्या निधनानंतर लोटे औद्योगिक परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 01/Oct/2024














