रत्नागिरीत आज ज्येष्ठ नागरिक दिन

रत्नागिरी : रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघात आज मंगळवारी, १ ऑक्टोबर रोजी संघाच्या शिवाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सायंकाळी ४.०० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा होणार आहे.

कार्यक्रमाला रत्नागिरी लायन्स क्लबचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेले व त्यावरील सभासद तसेच वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सभासद दांपत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यातील सभासदांचे वाढदिवसही साजरे करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला संघाच्या सभासदानी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ व पदाधिकारी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 01-10-2024