चिपळुणात आज प्रांताधिकारी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन

चिपळूण : चिपळूण येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन दि. १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या अल्पबचत भवन या इमारतीच्या जागेत नवीन प्रांताधिकारी कार्यालय बांधले जाणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत तसेच महसूल व पुनर्वसन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. सुनील तटकरे, खा. नारायण राणे, आ. अॅड. निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड, आ. भास्कर जाधव, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. शेखर निकम, आ. डॉ. राजन साळवी, आ. योगेश कदम तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, विभागीय आयुक्त विकास पानसरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी आकाश लिगाडे, चिपळूण तहसीलदार प्रवीण लोकरे, गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 01-10-2024