रत्नागिरी : एसटी बसचालकाला दुचाकी चालकाची मारहाण

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या पुढील रस्त्यावर एस.टी. बसपुढे दुचाकी आडवी लावत अज्ञात कारणातून एसटी चालकाला शिवीगाळ करत केली. या प्रकरणी मारहाण एका आरोपीतविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी दुपारी ३ वा. सुमारास घडली.

श्वेतांग वायंगणकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात एसटी चालक अजय भगवान पोटभरे (३२, मूळ रा. परळी बीड सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी दुपारी ते आपल्या ताब्यातील एसटी (एमएच- २०-बीएल-१२५४) प्रवासी भोऊन रहाटापरातून रत्नागिरी ते नृसिंहवाडी असे जात होते. ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या पुढे आले असता श्वेतांग वायंगणकर आपल्या दुचाकीवर अन्य दोघांना बसवून त्याच रस्त्याने जात असताना त्याने दुचाकी एसटीच्या पुढे नेऊन आडवी लावली. एसटी चालक अजय पोटभरे यांनी एसटी थांबवली असता श्वेतांगने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पोटभरे एसटी घेऊन पुढील प्रवासाला निघाले असता श्वेतांगने पुन्हा त्याची दुचाकी एसटीच्या आडवी लावून थांबवली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूचे दगड एसटीच्या दोन्ही आरशांवर मारुन फोडत नुकसान केले, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाक दाखवत परावृत्त केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 01/Oct/2024