खेड : खेड बसस्थानकातून ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावर मार्गस्थ होणाऱ्या ३२ फेऱ्या १ ऑक्टोबरला रद्द करण्यात येणार आहेत. रोहा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी जादा बसफेऱ्या सोडण्यात येणार असल्याने बसफेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
३० सप्टेंबरला येथील आगारातून सुटणाऱ्या ११ बसेस रद्द करण्यात आल्या. १ ऑक्टोबरला खेड-बिजघर वस्ती, खेड-कात्रण वस्ती, खेड-मंडणगड वस्ती, खेड-भेलसई वस्ती, खेड- कोंडिवली-शिव, खेड-आयनी, खेड- वाडीजैतापूर वस्ती, खेड-कशेडी, खेड- नांदिवली, खेड-महाड वस्ती, खेड-चिपळूण, खेड-तिसंगी, खेड किल्लेमाची, खेड-शिवतर, खेड- पन्हाळजे, खेड-तुळशी बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 01-10-2024














