चिपळूण : गेली काही वर्षे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना विविध प्रश्नांसाठी लढा देत आहे. पोफळी महानिर्मिती व्यवस्थापन जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे. एस. पी. सपकाळ, सनी कांबळे व नीलेश शिंदे यांच्यावर अन्याय होत आहेत. याबाबत व्यवस्थापनाकडे वारंवार लेखी निवेदन देऊन चर्चा करूनही व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याने १ ऑक्टोबरपासून कंपनीच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याची माहिती मागासवर्गीय संघटनेच्या अध्यक्षांनी दिली.
कोरोनाच्या काळात महानिर्मिती कंपनीचे कर्मचारी प्र. वा. सपकाळ यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी एस. पी. सपकाळ या कंपनीच्या दवाखान्यामध्ये काम करत असून त्यांना त्याच ठिकाणी खोली मिळणे बंधनकारक असूनही त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरूष यांच्या विचारमंच या ठिकाणी बंदिस्त शेड व्हावी त्याच ठिकाणी सुसज्ज वाचनालय असावे, अशी मागणी आहे. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेकडून वारंवार विविध प्रश्न घेऊन महानिर्मिती व्यवस्थापनाशी वारंवार चर्चा व निवेदने दिली जातात; मात्र त्याला केराची टोपली दाखवली जाते. संघटनेवर सुडाचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, १ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष संजय गोळपकर, माजी केंद्रीय उपाध्यक्ष विनोद कांबळे, सर्कल अध्यक्ष विलास जाधव व सर्कल सचिव संतोष शिंदे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 01-10-2024














