रत्नागिरी : कंत्राटी शिक्षक भरतीत ४९५ स्थानिकांना नियुक्ती

चिपळूण : रत्नागिरी येथील शिक्षक भरतीत तब्बल ४९५ स्थानिकांना नियुक्ती देण्यात आली आहे.

शाळांमधील रिक्त असलेल्या जागांवर कंत्राटी पद्धतीने डीएड, बीएड व पदवीधर बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने ५ सप्टेंबर रोजी आदेश काढले होते. त्यानुसार भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देखील संबंधित विभागाला देण्यात आले होते.

राज्यात अनेक ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र, रत्नागिरी जिल्हा त्याला अपवाद ठरला होता. रत्नागिरी जिल्ह्यात भरती प्रक्रिया ठप्प होती. दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रियेत ४९५ स्थानिकांना नियुक्ती देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 17/Jan/2025