रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंदाचे उद्या वार्षिक स्नेहसंमेलन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंद (रत्नागिरी तालुका) आयोजित 20 वे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. 18 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत आहे. या शिबिराच्या निमित्ताने निवृत्त महसूल वृंद एकत्र येणार असून त्याची जय्यत तयारी महसूल वृंदाच्यावतीने करण्यात येत आहे.

शनिवार दि. 18 जानेवारी रोजी बालाजी मंगल कार्यालय, नाचणे, रत्नागिरी येथे संपन्न होत असलेल्या या स्नेहसंमेलनाला सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त सकाळी 9 ते 11 या वेळेत निवृत्त महसूल वृंद तसेच मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात होईल. 11. ते 11 30 वा. उद्घाटन सत्र, दीपप्रज्वलन, स्वागत गीत, तसेच दिवंगतांना श्रद्धांजली, प्रास्ताविक आणि स्मरणिका प्रकाशन. त्यानंतर 11.30 ते दुपारी 12.30 वा. 75 वर्षे पूर्ण, 50 वर्षे विवाहास पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सत्कार. 12.30 ते 13.00 वा. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत. 13.00 ते 13.30 वा. तालुकाप्रमुखांचे मनोगत. 13.30 ते 14.00 वा. विशेष मान्यवर वक्त्यांचे मनोगत, 14.00 ते 15.00 वा. नेहभोजन कार्यक्रम. 15.00 ते 15.15 वा. जिल्हा कार्यकारिणीची निवड. 15.15 ते 15.35 वा. मनोरंजनाचा कार्यक्रम. 15.35 ते 15.50 वा. अध्यक्षांचे मनोगत असे कार्यक्रम होणार असून सायंकाळी 15.50 ते 16.00 या वेळात आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व निवृत्त महसूल वृंदाने या स्नेहसंमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंद (रत्नागिरी तालुका) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 17/Jan/2025