थिबा पॅलेस परिसरातील अनधिकृत बांधकामाचे पत्रे काढले

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरातील पत्र्याच्या अनधिकृत बांधकामाचे पत्रे पालिकेने काढले आहेत.

मनसेने दिलेल्या निवेदनानंतर ही कारवाई करण्यात आली. अखेर यावर आम्ही समाधानी आहोत, असे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी सांगितले. थिबापॅलेस परिसरातील वाहनतळ आरक्षण पालिकेकडून उठवण्यात आल्याचा प्रकार हे पालिका प्रशासनाचे गलथान कारभाराचे उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शहरातील थिबापॅलेस परिसरात पत्र्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात केले होते. ते हटवावे असे निवेदन मनसे पालिकेला दिले; परंतु पालिकेने ते काढले नव्हते. त्यामुळे मनसेने आंदोलन केले. त्यानंतर आज पालिकेने पत्रे काढले. त्यामुळे हा परिसर मोकळा झाला आहे. थिबापॅलेस परिसरातील आरक्षणाविषयी सौंदळकर म्हणाले, खासगी विकासकाच्या घशात भूखंड घालण्यासाठीच संगनमताने आरक्षण घालवले जात आहे. याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी केली आहे. शहर विकास आराखडा करताना हजारी माणसामागे किती जागा आरक्षित ठेवायची असते, आरक्षण कशाला असते याची माहिती मुख्याधिकाऱ्यांना असली पाहिजे. या विषयावरून मनसे आक्रमकपणे रत्नागिरी शहरात सक्रिय आहे. याबाबतचे निवेदनही मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, वनमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. रत्नागिरी शहर विकास आराखड्याची जे कोणी वाट लावत आहेत, त्या सर्वांना घरी पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांना ठणकावले. याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, महेंद्र गुळेकर, शहराध्यक्ष बाबय भाटकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, प्रभात सुर्वे, शैलेश मुकादम आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 17-01-2025