दापोली : विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यास क्रमाबरोबर दैनंदिन जीवनातही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत नावीन्याचा शोध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन केदार साठे यांनी दमामे येथे केले. कोकणभूमी शिवप्रतिष्ठान (रजि) मुंबई या संस्थेच्या वतीने दापोलीतील सह्याद्री शिक्षण संस्था संचालित, न्यू इंग्लिश स्कूल, दमामे येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सध्याच्या युगात विद्याभारतीची शिक्षण प्रणाली भारतीय संस्कृती व ज्ञानार्जन परंपरा टिकऊन ठेवणारी आहे, सरकारच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ती खऱ्या अर्थाने राबवण्याची नितांत गरज आहे, असे देखील साठे म्हणाले.
विद्यार्थ्यांना दहावीचे वर्ष, बोर्डाची परीक्षा, प्रत्येक विषयाचे आखलन, प्रश्नपत्रिका – उत्तर पत्रिका, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे नियोजन याची उत्तम माहिती यावेळी प्रमुख वक्ते प्रा. संदीप भावे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र उतेकर, सल्लागार नामदेव पवार, सचिव विलास जाधव यांनी विद्यार्थ्यांसाठी या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या व्याख्यानाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 17/Jan/2025














