लांजा : गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा नदीत मृतदेह आढळला

रत्नागिरी : गोळवशी ओमळी तेलीवाडी येथील माळरानावर गुरे चारण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेचा मृतदेह नदीच्या पाण्यात आढळला. सुमती दत्ताराम तेली (वय ६५) असे त्या महिलेचे नाव आहे.

याबाबत तिचा मुलगा तानाजी दत्ताराम तेली (वय ४७, रा. तेलीवाडी, गोळवशी) याने लांजा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमती नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान गोळवशी गावातील ओमाळी या ठिकाणी गुरे चारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दुपारी उशीर झाला तरी त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी गावामध्ये शोधाशोध केली. परिसरात शोध घेत असताना धावबा मंदिर पुलाजवळ नदीच्या काठी सुमती यांचा मृतदेह आढळला. या घटनेबाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मोरे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 01-10-2024