गुहागर : गुहागर सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालय आयोजित रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरीचे ४८ वे सन २०२४-२०२५ वार्षिक अधिवेशन १८ ते दि. १९ जानेवारी या दरम्यान पाटपन्हाळे येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वर्धाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण भवनचे प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नागिरीचे निरीक्षक हेमंत काळोखे, अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, दिलीप कोरे, कोकण विभाग ग्रंथालय संघ रत्नागिरीचे ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक, ज्येष्ठ उद्योजक श्रीराम खरे, संभाजी सावंत, श्रीकांत पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र दळवी, राकेश आंबेरकर, राजेंद्र आरेकर, दत्तात्रय गुरव, मनाली बावधनकर आदी उपस्थित राहणार आहेत. दि. १८ रोजी प्रतिनिधी नोंदणी व अधिवेशन उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम कोळीनृत्ये, ड्रामा डान्स, जाखडी आदी कार्यक्रम होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:49 AM 18/Jan/2025












