रत्नागिरी : एसटी प्रवासादरम्यान चक्कर येउन बेशुध्द पडलेल्या वृध्द प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार १६ जानेवारी रोजी सकाळी घडली. सोना पांडूरंग नेवरेकर (८५, रा. करबुडे काजरे कोंडवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्द प्रवाशाचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी ते विजयदुर्ग ते रत्नागिरी असा एसटीने प्रवास करत होते. त्यांची एसटी सकाळी ८.५० वा. सुमारास भाट्ये दर्गा येथे आली असता सोना नेवरेकर यांना चक्कर येउन ते बेशुध्द पडले. एसटीतील इतर प्रवाशांनी त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 18-01-2025













