रत्नागिरी : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्र शासनाची भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्ता योजना (विद्यावेतन) यांची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईनरित्या करण्यात येत आहे. या योजनांचा सन २०२४- २५ मध्ये लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 18/Jan/2025














