चिपळूण नगर परिषद ठरली वार्षिक क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकतीच पार पडली. या वार्षिक क्रीडा स्पर्धेत चिपळूण नगर परिषदेने चॅम्पियनशिप पटकावली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण न.प.ला हा सन्मान मिळाला.

बॅडमिंटनमध्ये प्रवीण नाईक, टेबलटेनिसमध्ये अवधूत बेंद्रे (उपविजेता), बुद्धीबळमध्ये निवेदिता आंबेकर (उपविजयी), कॅरममध्ये प्रेरणा कांबळे, कबड्डी संघ व रस्सीखेच महिला संघाला उपविजेतेपद मिळाले. शंभर मीटर धावणेमध्ये अनिकेत सकपाळ, ओंकार गोरिवले (द्वितीय व तृतीय), शंभर मी. धावणे महिलांच्या गटात निवेदिता आंबेकर (प्रथम), सायली खेतले (द्वितीय), २०० मी. धावणेमध्ये ओंकार गोरिवले (द्वितीय). २०० मी. धावणे महिलांमध्ये निवेदिता आंबेकर व सायली खेतले (प्रथम व द्वितीय), लांबडडी निवेदिता आंबेकर, गोळाफेकमध्ये आनंद बामणे व अनिकेत सकपाळ (द्वितीय व तृतीय), तसेच सांस्कृतीक स्पर्धा रत्नागिरी येथे झाल्या. या स्पर्धेतही चिपळूण न.प.ने यशाचा आलेख कायम ठेवला. वैयक्तीक गायन स्पर्धेत नारीशक्ती पोवाडा सादर करण्यात आला. यामध्ये संतोषी चोगले, मयुरी जाधव, राजक्रांती तांबे, निवेदिता आंबेकर, मुक्ता कोकाटे, सायली खेतले, सतीश गोरिवले, संकेत रामाणे, राजेंद्र नवरत यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

सामूहिक नृत्य स्पर्धेत घूमर रिमिक्सला उत्तेजनार्थ, तर जोगवा फ्यूजनला तृतीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत राकेश बारये (प्रथम), कृष्णत मोहिते (तृतीय) यांनी यश मिळविले. यशस्वी कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकारी विशाल भोसले व अन्य अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

चिपळूण न.प.चे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधिक्षक रोहित खाडे, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरिक्षक महेश जाधव, सुजित जाधव, इंजिनिअर दीपक निंबाळकर, अवधूत बेंद्रे, आस्थापना विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, नागरी सुविधा केंद्र प्रमुख वलीद वांगडे, संतोष शिंदे, आनंद वामणे आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 18/Jan/2025