गुहागर : श्रृंगारतळी गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मनसेचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन

गुहागर : गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी जानवळे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांना निवेदन सादर केले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, जानवळे गावात जाणारा जानवळे फाटा येथून चा रस्ता अतिशय निकृष्ट झाला असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून पादचाऱ्यांनाही चालणे दुरापास्त झाले. आहे मोठे मोठे खड्डे पडले असून दुचाकी चालवणे ही जीव घेणे ठरत आहे. कारणामुळे रस्ता खराब असल्याने एसटी बस उलटली होती सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

तरीही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात फार मोठे जीव घेणे अपघात घडू शकतात. आणि तसे घडल्यास आपण स्वतः सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी, सबब ही की त्वरित या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी, अन्यथा येत्या २६ जानेवारी रोजी आपले कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे लक्षणीय उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे शेवटी विनोद गणेश जानवळकर यांनी म्हटले आहे. या निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांना देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 18/Jan/2025