संगमेश्वर : गोळवलीतील अशोक दुदम यांच्या नमनाचे मुंबईत प्रयोग

साखरपा : कोकणापुरती मर्यादित असलेली नमन ही लोककला सर्वदूर जावी या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गोळवली येथील अशोक दुदम यांच्या नमनाचा प्रयोग मुंबईत सादर करण्यात आला.

भारूड, जाखडी, खेळे हे खास कोकणातील लोककलेचे प्रकार. त्यापैकी आणखी एक कला म्हणजे नमन. गावोगावी असलेली नमन मंडळे स्थानिक पूजा, समारंभात नमन सादर करत असतात; पण संगमेश्वर तालुक्यातील अशोक दुदम यांनी मात्र कोकणातील या लोककलेला थेट मुंबईत मानाचे स्थान मिळवून दिले आहे. नुकत्याच नमन मंडळाचा प्रयोग मुंबईच्या गिरगाव येथील साहित्यसंघात पार पडला. राजा-राणीच्या पारंपरिक वगनाट्याला फाटा देत समाजप्रबोधनपर विषयांवर वगनाट्य सादर करण्यात आले. या नाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन रूपेश दुदम यांनी केले होते. मुंबईतील लोककला जाणकारांनी या प्रयोगाला हजेरी लावत नमनाची प्रशंसा केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 18/Jan/2025