रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या सहयोगाने झालेल्या आंतर महाविद्यालयीन गटातील महाराष्ट्रीय कलोपासक पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये कुडाळ महाविद्यालयाच्या ऑफलाइन या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषित पटकावले.
चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात दोन दिवस झालेल्या या स्पर्धेमध्ये एकूण ९ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक देवरूख येथील आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या हिरो नंबर वन एकांकिकेला, तर सांघिक तृतीय क्रमांक रत्नागिरीच्या फिनोलेक्स कॉलेजच्या होलियो एकांकिकेने पटकावला. प्रायोगिक संघ म्हणून खेड येथील सिद्धयोग लॉ कॉलेजच्या समाप्त एकांकिकेची निवड करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 01-10-2024














