खेड : कुळवंडी मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४ शेळ्या ठार

खेड : खेड तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्या वाघाची दहशत पसरलेली आहे मानवी वस्तीपर्यंत दाट वाढलेल्या जंगलामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये मुक्तपणे संचार करत आहेत. खेड तालुक्यातील कुळवंडी शिंदेवाडी येथील शेतकरी श्री संकेत संजय शिंदे यांच्या चार बकऱ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे.

कुळवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्या चा संचार सुरू बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातून सातत्याने केली जात होती. मात्र योग्य ती कार्यवाही न झाल्याने बिबट्या थेट मानवी वस्ती पर्यत आता धाव घेऊ लागला आहे.

दरम्यान झालेल्या घटने नंतर या शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवलेली आहे. वन विभागाने तातडीने दखल घेऊन सदर शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ विलास शेळके यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 01-10-2024