गुहागर : अडूर बाजारपेठेत वॉटर एटीएम

गुहागर : तालुक्यातील अडूर ग्रामपंचायतीने अडूर बाजारपेठेतील जुनी सहाण येथे वॉटर एटीएम मशिनचा प्रारंभ केला. गुहागर तालुक्यात येणारे पर्यटक, नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी अडूर ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून वॉटर एटीएम मशीन बसवली आहे. वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करून देणारी अडूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा प्रारंभ सरपंच शैलजा गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना, तसेच विशेषतः पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी अडूर ग्रामपंचायतीने १५ व्या आयोगाच्या आराखड्यात नियोजन केले होते. आज बाजारात वीस रुपये लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा दर आहे; मात्र अडूर ग्रामपंचायतीने एक रुपयामध्ये एक लिटर व पाच रुपयामध्ये दहा लिटर पाणी असे माफक दर ठेवले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 20/Jan/2025