महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघात रत्नागिरीच्या साक्षी डाफळेची निवड

रत्नागिरी : पश्चिम विभागीय अस्मिता खेलो इंडिया खो- खो स्पर्धेच्या महाराष्ट्र महिला संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. हा संघ वडोदरा गुजरात येथे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला असून या संघात रत्नागिरीच्या साक्षी डाफळे हिची निवड करण्यात आली आहे.

या संघात रत्नागिरीच्या साक्षी डाफळे हिचा समावेश झाला आहे. रत्नागिरी संघातील उत्कृष्ट आक्रमक खेळाडूंमध्ये तिचा समावेश आहे. गतवर्षी मुंबई विद्यापिठाच्या संघामध्येही तिची निवड झाली होती. प्रशिक्षक पंकज चवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती सातत्याने चांगला खेळ करीत आहे. तिच्या निवडीबद्दल जिल्हा खो-खो असोसिएशनच्यावतीने तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 01-10-2024