रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांच्या कौशल्य ज्ञानात भर घालण्यासाठी बहुउद्देशीय कौशल्य विकास लॅबचा मोठा फायदा होणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनी उर्वरित शाळांमधील लॅबची सोय उपलब्ध होईल, यासाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना भाजपचे विधान परिषदेचे आ. निरंजन डावखरे यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या दामले विद्यालयातील लॅबच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.
रत्नागिरी नगर परिषदेच्या १८ प्राथमिक शाळांसाठी बहुउद्देशीय कौशल्य विकास लॅब निर्मितीसाठी निधी प्राप्त झाला आहे. रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्र.१५ मध्ये (दामले विद्यालय) या कौशल्य लॅब विकास कामाचा लोकार्पण सोहळा आ. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्गासमोर आ. डावखरे यांनी सांगितले की, प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना कौशल्य ज्ञानाचे महत्त्व कळून ते आत्मसात करण्यासाठी बहुउद्देशीय कौशल्य विकास लॅब महत्त्वाच्या असल्याचेही यावेळी आ. डावखरे यांनी बोलताना नमुद केले.
या लोकार्पण सोहळ्याला मुख्याधिकारी तुषार बाबर, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी सुनील पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच शहर व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 01/Oct/2024














