गडकरी साहेब, राज ठाकरे, तज्ञ नेते सांगतायेत राज्याची परिस्थिती अडचणीत; ही चिंतेची बाब : सुप्रिया सुळे

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली गेली. आता या योजनेवरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाने सरकारचीच कोंडी झाली आहे.

त्याबाबत सुप्रिया सुळेंनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. गडकरी साहेब, राज ठाकरे आणि काही तज्ञ असे नेते आणि लोक वारंवार महाराष्ट्राच्या परिस्थिती अडचणीत आहे असं सांगत आहे. महाराष्ट्र सरकार मधील लोक असं सांगत असेल तर ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

नितीन गडकरी यांनी त्यांच्या शैलीत भाष्य करत सरकारच्या भरवशावर राहू नका, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्यांना दूर ठेवा. सरकार विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्यांना बुडवते. त्यामुळे जे काही अनुदान मिळते ते घेऊन टाका पण कधी मिळेल, केव्हा मिळेल याचा भरवसा नाही. अनुदान मिळेल की नाही माहिती नाही. असे सवाल उपस्थित केले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांनी सत्तेमध्ये असणाऱ्या गडकरी यांना विचारायला पाहिजे असं मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे. नितीन गडकरी यांनाच आजची माहिती जास्त असणार. गडकरी साहेब, राज ठाकरे आणि काही तज्ञ असे नेते आणि लोक वारंवार महाराष्ट्राच्या परिस्थिती अडचणीत आहे असं सांगत आहे. महाराष्ट्र सरकार मधील लोक असं सांगत असेल तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. आमचे जयंत पाटील सातत्याने यावर बोलत होते. पण कोणीही गांभीर्याने घेतलं नाही. कॅबिनेट मध्ये अनेक वेळा वित्त मंत्रालयाकडून विरोध केला जातो. आणि त्याच्यावर कोणी ऐकत नाही. रेटून निर्णय घेतले जातात. जी परिस्थिती आत्ता ऐकायला मिळते त्याला सर्वस्वी ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. प्रचंड गडबड करून ठेवली आहे. उद्घाटन, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घर फोडा एवढेच काम करत आहे. जेव्हा जयंत पाटील अर्थमंत्री होते तेव्हा हे राज्य सरप्लस राहिलेला आहे.

धर्मवीर २ बाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही राजकारणात पॉलिसी मेकिंग साठी आलो आहे. सिनेमा हा असलाच पाहिजे सिनेमाही इंडस्ट्री आहे. मनोरंजन म्हणून पाहिला पाहिजे. सिनेमा हे राजकारण होऊ शकत नाही. ही घटना 23 वर्षांपूर्वी झाली आहे. इतक्या वर्ष तुम्ही सत्तेत होता. तुमचे नियत साफ असेल. तर टेलिव्हिजनवर बोलण्यापेक्षा पोलीस कमिशनर कडे गेल पाहिजे. होम मिनिस्टर तुमच्याकडेच आहे असे म्हणत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

हर्षवर्धन पाटील अन् आमचे चांगले संबंध

काही लोक मलाही भेटले त्यांची इच्छा आहे की तुतारी घेऊन राज्यभरात स्वाभिमान पद्धतीने लढावं. मानसन्मान करून निर्णय घेणारा पक्ष आहे. लोकशाहीने चालणारा हा पक्ष चालतो. हर्षवर्धन पाटील यांना आदराने मी भाऊ म्हणते त्यांच्या आणि आमचे कौटुंबिक संबंध 6 दशकांचे आहेत. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते संबंध जपले जातील. ते जो काय निर्णय घेतील त्याचा आमच्या कौटुंबिक आणि राजकीय निर्णयाशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 01-10-2024