चांदेराईत आज आरोग्य शिबिर

पावस : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व भगवान महादेव सांबरे रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर रत्नागिरी तालुक्यातील चांदराई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

मोफत आरोग्य शिबिर मंगळवारी (ता. २१) सकाळी १० ते २ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदाब व जनरल तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये आवश्यकता वाटल्यास पालघर येथील भगवान महादेव सांबरे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. चष्मे वाटप, शुगर तपासणी, मोतीबिंदू, मूतखडा, मूळव्याध, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील. तसेच मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. तपासणीसाठी येताना सोबत जुने अहवाल घेऊन येणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 21-01-2025