रत्नागिरी : विश्व हिंदू परिषद दक्षिण रत्नागिरी ग्रामीण प्रखंडातर्फे (पाली) राम मंदिर वर्षपूर्ती सोहळा सत्संग प्रमुख रमेश तेंडुलकर यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत उपस्थित होते.
या वेळी श्री लक्ष्मी पल्ल्लीनाथ देवस्थान अध्यक्ष संतोष सावंतदेसाई, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री अशोक पाखरे, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख सचिन रेमणे, स्वामी मलिक संस्था अध्यक्ष मिलिंद पावसकर, जिल्हा सत्संग प्रमुख अशोक शिंदे उपस्थित होते.
श्रीराम मंदिर आयोध्या येथील निर्माण कार्य आणि रचनेबाबत अधिवक्ता सचिन रेमणे यांनी सविस्तर माहिती दिली. जिल्हा सहमंत्री अशोक पाखरे यांनी विश्व हिंदू परिषदेचे कार्य व विविध आयाम याची माहिती दिली. अशोक शिंदे यांनी देशभक्तीपर गीत, अभंग सांगून सत्संग घेतला. श्री देवलक्ष्मी पल्लिनाथ देवस्थान अध्यक्ष संतोष सावंतदेसाई यांनी मंदिर देवस्थान आयामप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात पूर्ण वेळ देण्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रखंडमंत्री सुंदर हिरवे, प्रखंड सहमंत्री मंगेश पांचाळ, नैतिक मूल्य शिक्षणचे प्रमुख राजाराम सावंत, सत्संगप्रमुख रमेश तेंडुलकर, बजरंग दल संयोजक प्रथमेश पांचाळ, मातृशक्ती प्रमुख सौ. स्वाती सावंत, अध्यक्ष प्रवीण सावंत यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 21/Jan/2025












