चिपळूण : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यात तालुक्यातील नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नवरात्रोत्सवात डीजेसह लेसर लाईटचा वापर करू नका, अशा सक्त सूचना दिल्या.
नवरात्रोत्सवानिमित्त तालुक्यात ग्रामदैवतांच्या मंदिराप्रमाणेच शहरातील काही सार्वजनिक मंडळाकडून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना होत असल्याने त्या ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमांत डीजे तसेच लेदार लाईटचा वापर केल्याने त्याचे आरोग्यावर भीषण परिणाम झाल्याच्या घटना राज्यातील विविध भागांत घडल्या आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी बाळगली आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीत मंडळांना सूचना देताना पोलिस निरीक्षक मेंगडे म्हणाले, नवरात्रोत्सव साजरा करताना डीजेसह लेझार लाईटचा वापर करू नये. प्रत्येक मंडळाने गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक लावला जाऊ नये. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे प्रकार टाळून नवरात्रोत्सव शांततेत साजरा करावा. तालुक्यात १७ नवरात्रोत्सव मंडळे असून त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 01/Oct/2024














