रत्नागिरी : बालवाडीच्या ओसरीत भरते मेर्वी गुरववाडीची शाळा

पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी (सेमी इंग्रजी) जिल्हा परिषद शाळेसाठी स्वतंत्र इमारत नसल्याने शाळा बालवाडीच्या ओसरीत भरत आहे. शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार व खासदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बालवाडीची इमारत सेस फंड व ग्रामपंचायतीच्या निधीतून बांधण्यात आली होती; परंतु ती मोडकळीस आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नव्या इमारतीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे पाठवला आहे.

सध्याची इमारत अत्यंत धोकादायक झाल्याने मेर्वी गुरववाडीतील शाळा बालवाडीच्या ओसरीत (पडवी) भरत आहे. ग्रामपंचायतीकडून इमारतीसाठी २८ ऑगस्टला शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच महिला बालकल्याण अधिकारी यांच्याकडेही २५ जुलैला इमारतीचा प्रस्ताव पाठवला आहे; परंतु त्यावर कार्यवाही झालेलो नाही. पालकमंत्री यांच्याकडेही २२ जुलैला मागणी अर्ज दिला होता; परंतु त्यावरही कार्यवाही झालेली नाही. शाळेला इमारत देण्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, याबाबत ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 01/Oct/2024