राजापूर एसटी डेपोसमोर उड्डाणपुल उभारण्याची मागणी

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाचे तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी, शहरातील राजापूर एसटी डेपोसमोरील भागातील काम अद्यापही अपूर्ण आहे. उतार-नागमोडी वळणे-चढाव असा मार्ग आणि दोन्ही बाजूला लोकवस्ती अशी विचित्र स्थिती आहे. अशा स्थितीत आडव्या-तिडव्या धावणाऱ्या सुसाट वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागामध्ये मोठा अपघात होण्यापूर्वी उड्डाणपूल (ओव्हरब्रीज) उभारावा, अशी मागणी राजापूरवासीयांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी कुमावत यांच्यासह सहकाऱ्यांनी डेपोसमोरील रखडलेल्या कामाची पाहणी करून या ठिकाणी उड्डाणपूल कुठे आणि कसा उभारता येईल, याबाबतची माहिती नकाशासहित देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, माजी नगरसेवक विनय गुरव, शीतल पटेल, अरविंद लांजेकर, विवेक गुरव, सेवानिवृत्त अभियंता जगदीश पवार, ऋषिकेश कोळेकर, आजिम जैतापकर, अशफाक मापारी, कमलाकर कदम, तात्या सरवणकर, शहबाज खलिफे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

याभागामध्ये भरधाव वाहनांमुळे क्रॉस करताताना अपघाताची शक्यता आहे एसटी डेपोमध्ये सातत्याने गाड्या जा-ये करतात. या परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती वसलेली असून बँकाचीही कार्यालये आहेत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने लोकांची कायम वर्दळ असते. त्यामुळे या भागातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. जगदीश पवार यांनी उड्डाणपूल कुठे आणि कशा पद्धतीने उभारता येईल याची नकाशासह माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत अॅड. खलिफे, गुरव, पवार यांच्या अन्य ग्रामस्थांनी भाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 21/Jan/2025