राजापूर : राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आर. एस. पी. एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी वरद रहाटे, समृद्धी कलाज आणि माधवी घुगरे यांनी सध्याच्या तंत्रज्ञान युगामध्ये विविध कामे करण्यासाठी रोबोट तयार केला आहे. इंडस्ट्रीसह अन्य क्षेत्रांमध्ये कमी मनुष्यबळामध्ये विविध स्वरूपाची कामे करण्यासाठी हा वैशिष्ट्यपूर्ण रोबोट उपयुक्त ठरणार आहे. जिल्हास्तरीय आंतरशालेय रोबोटिक्स रोबोकॉन स्पर्धेमध्ये या रोबोटने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या या रोबोटचा एखादी इंडस्ट्री वा कंपनीमध्ये मालाची ने-आण करणे, शेकडो किलोचे जड साहित्य, माल वा सामान हलवणे, शाळकरी मुलांना हा रोबोट निश्चितच वैशिट्यपूर्ण आहे. रोबोट निर्मितीच्या माध्यमातून या मुलांमधील कौशल्याला चालना मिळाली असून, त्या संधीचे त्यांनी सोने करत तयार केलेला रोबोट निश्चितच कौतुकास्पद आहे.
रोबोटसंबंधी सविस्तर माहिती देणे, आदींसाठी उपयोग करता येईल. मुख्याध्यापक नीलेश पवार, डॉ. राजश्री महाजन, प्रिया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोबोट तयार केला आहे. स्काई रोबोटिक्स (पुणे) आणि परशुराममधील एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एसपीएम स्कूलमध्ये आयोजित रोबोटिक्स रोबोकॉन स्पर्धेत हा रोबोट चर्चेचा विषय ठरला. शालेय विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील १६ शाळांमधील १८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये शहरातील आर.एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यांनी बनवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रोबोटने पारितोषिक पटकावले.
निर्मितीसाठी लागलेले साहित्य
वरद रहाटे, समृद्धी कलाज आणि माधवी घुगरे या विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला. समृद्धी कलाज हिच्या संकल्पनेतून हा रोबोट तयार करण्यासाठी डीसी मोटर्स, सीडी मोटर्स इन्टीफेस, कस्टर व्हील, बॉडी चेसिस, सेन्सर, सेल होल्डर, सेल, स्क्रू, आदी साहित्यांचा वापर करण्यात आला. हे साहित्य डॉल्फिन लॅब यांनी उपलब्ध करून दिले. सुमारे चार इंच उंचीचा असलेला हा रोबोट पाच-सहा दिवसांमध्ये तयार करण्यात यश आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 21/Jan/2025














