रत्नागिरी : रॅलीस डीएमएलटी कॉलेजचे अध्यक्ष अण्णा पवार यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ह्यांची घेतली भेट

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आणि महत्वाची शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे. रॅलीस फौंडेशनच्या वतीने आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज, वाटुळ तालुका राजापूर येथे शासन मान्य डीएमएलटी कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कोर्सच्या प्रारंभानिमित्त, रॅलीस फौंडेशनचे अध्यक्ष श्री अण्णा पवार आणि त्यांचे सहकारी गणेश सुर्वे यांनी कोकण विभागीय शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिर्के हायस्कूल, रत्नागिरी येथे भेट घेतली.

आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज, वाटुळ तालुका राजापूर येथे सुरू झालेल्या डीएमएलटी कोर्सच्या माध्यमातून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच उच्च शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. रॅलीस फौंडेशनचे अध्यक्ष श्री अण्णा पवार आणि गणेश सुर्वे यांनी आ. म्हात्रे यांची भेट घेतली आणि संस्थेची माहिती दिली. आ. म्हात्रे यांनी संस्थेची पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना डीएमएलटी कोर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

या कोर्समुळे विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावे लागणार नाही, असे आ. म्हात्रे यांनी सांगितले. ही संधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असून, त्यांना स्थानिक स्तरावरच शिक्षण घेता येईल. रॅलीस फौंडेशनचे अध्यक्ष श्री अण्णा पवार यांनी स्नेह भेटीसाठी म्हात्रे सरांचे आभार व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 22-01-2025