रत्नागिरी : झोपेतच आकडी आलेल्याचा मृत्यू

रत्नागिरी : झोपेतच आकडी येऊन बेशुद्ध पडलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. भरत शांताराम शेट्ये (वय ७०, रा. काळबादेवी-मयेकरवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

ही घटना सोमवारी (ता. २०) सकाळी पावणेआठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेट्ये हे घरात बेडवर झोपले होते. झोपेतच त्यांना आकडी आली. बेशुद्धावस्थेत नातेवाईकांनी त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 22-01-2025