दापोली : गतिरोधकावरून दुचाकी घसरून दोघे जखमी

दापोली : दापोलीच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणावेळी शहरातील रहदारीच्या मार्गावर राधाकृष्ण मंदिरसमोर नव्याने गतिरोधक टाकण्यात आला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण केले असल्याने या ठिकाणी बारीक खडी टाकण्यात आली आहे. या गतिरोधकाबाबत कोणतीही सूचना अथवा फलक लावण्यात आलेला नसल्याने मंगळवारी सकाळी या गतिरोधकावरून दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी झाला.

दुचाकीच्या पाठीमागे बसलेलाही जखमी झाला आहे. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या ठिकाणी यापूर्वी गतिरोधक नव्हता. त्यामुळे अचानक टाकलेल्या गतिरोधकामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे गतिरोधकावर रंगरंगोटी करावी व सूचना फलकही लावावेत, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 22-01-2025