लांजा : लांजा तालुक्यातील श्री विठ्ठलाई स्पोर्टस् क्लब, केळंबे या मंडळाने रविवारी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेत प्रथम क्रमांक बोरथडे येथील केदारलिंग प्रसन्न व हातीव येथील वेदांत गावडे यांनी पटकावला.
लांजा तालुक्यातील केळंबे येथे झालेल्या चिखल नांगरणी स्पर्धेत तब्बल १०५ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. घाटी व गावठी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. घाटी गटामध्ये प्रथम क्रमांक केदारलिंग प्रसन्न (बोरथडे), द्वितीय क्रमांक दुर्गादेवी रवळनाथ (ओझर), तृतीय क्रमांक बाळूमामा प्रसन्न (केळंबे) चौथा क्रमांक भारत कांबळे (पालु), पाचवा क्रमांक वैभव हरमले (देवधे) यांनी पटकावला.
गावठी गटामध्ये प्रथम क्रमांक वेदांत गावडे (हातीव), द्वितीय क्रमांक भैरी-चंडिका (शिरवली), तृतीय क्रमांक बाबा गुरव (मार्लेश्वर), चौथा क्रमांक कारभारी (तुरळ), पाचवा क्रमांक स्वराज गुरव (आरवली) यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक ढाल देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे श्री विठ्ठलाई स्पोर्टस् क्लब, केळंबे या मंडळाचे संपत खानविलकर, योगेश झोरे, मनोज पवार, प्रभाकर झोरे, सुधाकर झोरे, प्रौतम झोरे, संतोष वाजे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:11 PM 01/Oct/2024














